Advertisement

'वैद्यकीय शिक्षण विभागात २९ कोटींचा घोटाळा' - धनंजय मुंडे


'वैद्यकीय शिक्षण विभागात २९ कोटींचा घोटाळा' - धनंजय मुंडे
SHARES

राज्यातील महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या ऑर्थोपॅडिक इम्प्लांट्स म्हणजे सांधेदुखीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणांची अवास्तव खरेदी करून २९ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी हा आरोप केला.


'यांचं संगनमत'

१६ महिन्यांपूर्वी वैद्यकिय शिक्षण विभागानं २९ कोटी रुपयांची ही उपकरणं खरेदी केली. तीन लाख ५४ हजार ६४५ उपकरणांपैकी १५ महिन्यांत केवळ १५ हजार ३५४ म्हणजे पाच टक्केही वापर झाला नाही. अवास्तव खरेदीमागे मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संगनमत असून अवास्तव दराने या उपकरणांची खरेदी करण्यात आली. तसंच १५ वर्षानंतरही ही उपकरणे संपणार नाहीत.


'याची चौकशी करा'

या उपकराणांचा दर्जाही संशयास्पद असून, उपकरणांचे सुट्टे भागही पुरवण्यात आलेले नाहीत. मुंबईच्या जीटी रुग्णालयाला एक लाख ७४ हजार १८२ उपकरणं दिली. त्यापैकी केवळ १५२ उपकरणांचा उपयोग झाला. हे उदाहरणादाखल सांगत राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयातील पुरवठा केलेल्या आणि प्रत्यक्षात वापरलेल्या उपकरणांची आकडेवारी त्यांनी पटलावर ठेवली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा