Advertisement

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री, देशमुखांचा राजीनामा मंजूर

दिलीप वळसे-पाटील हेच राज्याचे नवे गृहमंत्री असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री, देशमुखांचा राजीनामा मंजूर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे पद कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगलेली असतानाच, दिलीप वळसे-पाटील हेच राज्याचे नवे गृहमंत्री असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करण्याची तसंच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार  मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे-पाटील यांचेकडे देण्यास मंजुरी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी आहे. यापैकी कामगार विभागाचा कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- अखेर अनिल देशमुखांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा!

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. तर अजित पवार यांनी देखील पद सांभाळण्यास मोकळीक मिळत नसल्याने नापसंती दर्शवली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा एकदा अत्यंत अवघड परिस्थितीत गृहमंत्री पद वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.

कोण आहेत दिलीप वळसे-पाटील?

  • शरद पवार यांचे स्वीय साहाय्यक म्हणून कामास सुरुवात 
  • पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून उदय
  • १९९० साली कॉंग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकली
  • सलग २० वर्षे आंबेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
  • राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शरद पवारांचे विश्वासू साथीदार
  • युती सरकारच्या काळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार 
  • अर्थ, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा इ. महत्त्वाची खाती सांभाळली
  • २००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष
  • आघाडी सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी 

(ncp leader dilip walse patil will be a new home minister of maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा