Advertisement

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील नेता घाबरत नाही, नवाब मलिकांचं रोकठोक उत्तर

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील एकही नेता घाबरत नाही, असं रोकठोक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे.

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील नेता घाबरत नाही, नवाब मलिकांचं रोकठोक उत्तर
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर भाजपचे सर्वच नेते जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला देताना दिसत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील एकही नेता घाबरत नाही, असं रोकठोक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सांगितलं की, भाजपला जे करायचं आहे ते करावं. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा. ही काही नवीन गोष्ट नाही. फक्त एकच सांगतो की भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही, असं कडक प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

हेही वाचा- ‘ही’ तर लोकशाहीची हत्या, राणेंच्या अटकेनंतर भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रतिक्रिया देताना, या अटकेचा आम्ही संपूर्णत: निषेध, धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला आम्ही गर्भित इशारा देऊ इच्छितो की सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु!, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. 

तर, दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर राजनिती या हिंदी सिनेमातील अभिनेता मनोज वाजपेयी यांची एक क्लिप टाकली आहे. त्यात मनोज वाजपेयी भाषण करताना “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असा डायलाॅग म्हणताहेत. यातून नितेश राणे यांनी जशास तसं उत्तर देण्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेला दिला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा