Advertisement

'अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका' अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले


'अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका' अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले
SHARES

गेल्या काही महिन्यांत मुंबईत इमारती पडण्याच्या घटनेत वाढ होत आहेत. यासाठी सरकारच्या यंत्रणा कमी पडत आहेत. पण तरीही सरकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले.



'या' मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

सोमवारी पहाटे साकीनाका येथील दुकानाला आग लागून १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात विधानसभेत उमटले. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता या घटनेकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे. याची सर्व माहिती सभागृहात सादर करू असे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पण चंद्रकांत पाटलांच्या या उत्तराने समाधानी न झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना अशा घटना घडल्यावर याची माहिती देणे गरजेचे आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा घटना सातत्याने घडत आहेत. यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडत असून, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पवार यांनी केली. याचसोबत सभागृह संपण्यापूर्वी मुंबईतल्या इमारत दुर्घटना आणि आगीच्या घटनेविषयीची माहिती सादर करावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा