Advertisement

मी राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसंच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

मी राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
SHARES

पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसंच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्षाकडून सातत्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

माझ्या मते आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. पक्षातील सहकाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील पाऊल टाकलं जाईल. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याची कारण नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) म्हणाले होते.

हेही वाचा- ‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण

तर, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. आता पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केलं होतं.

यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढत असल्याची चर्चा होऊ लागली. परंतु या सगळ्या चर्चांना धुडकावून लावत पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसंच मी राजीनामा दिलेला नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

त्यातच रेणू शर्मा नावाच्या महिलेने तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजपच्याच (bjp) एका नेत्याने केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. रेणू शर्मा मागील ५ वर्षांपासून माझा पाठलाग करत होती. मात्र २ दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. आज तिने मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. कदाचित दोन वर्षांपूर्वी हीच वेळ माझ्यावर आली असती. उद्या कदाचित दुसरा कोणी त्याजागी असेल, त्यामुळेच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला, असं कृष्णा हेगडे म्हणाले. त्यानुसार हेगडे यांनी अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

(ncp mla and maharashtra social justice minister dhananjay munde denies news of resignation)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement