Advertisement

पोट दुखीमुळं राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल


पोट दुखीमुळं राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्या पोटात अचानक दुखायला लागल्यानं त्यांना बुधवारी रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून ‘तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये,’ असं मुंडे समर्थकांना सांगण्यात आलं.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल 

धनंजय मुंडे यांच्या पोटात अचानक दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.


चर्चांना उधाण

या बातमीनंतर सोशल मिडियावर अफवांना उधाण आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं ट्विटरवरुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुंडे समर्थकांना केलं. 'पोटदुखीच्या त्रासाच्या तपासणीसाठी आमदार धनंजय मुंडे मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचं कोणतंही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद', असे ट्विट ऑफिस ऑफ डीएम म्हणजेच धनंजय मुंडेच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आले. धनंजय मुंडे यांनाही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट रिट्विट केलं आहे.



हेही वाचा -

'बीसीसीआय'नं डे-नाईट कसोटीसाठी मागवले ७२ गुलाबी चेंडू

यंदाच्या दिवाळीत प्रदूषणात घट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा