Advertisement

यंदाच्या दिवाळीत प्रदूषणात घट


यंदाच्या दिवाळीत प्रदूषणात घट
SHARES

दरवर्षी दिवळीत अधिक प्रमाणात फटाके फोडल्यास हवेचं प्रदूषण वाढतं. परंतु, यंदा दिवाळीच्या दिवसात फटाक्यांच्या प्रदूषणात मागील वर्षांपेक्षा बरीच घसरण झाली आहे. तसंच, हवेचा गुणवत्ता निर्देशांकही समाधानकारक ते मध्यम पातळीवर राहिल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.

हवेच्या प्रदूषणाची पातळी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे औरंगाबाद, चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि नागपूर या १० ठिकाणी दिवाळीत हवेच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुणवत्ता निर्देशांकांत मागील वर्षांच्या तुलनेत मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी घट झाली असून, तो मध्यम पातळीवरून समाधानकारक पातळीवर आला.


गुणवत्ता निर्देशांकात घट

नागपूर, मुंबई या ठिकाणी भाऊबिजेच्या दिवशी मागील वर्षांच्या तुलनेत फारसा बदल झाला नाही. या दिवशी मागील वर्षांच्या तुलनेत औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी गुणवत्ता निर्देशांकात घट झाली असून मध्यमवरून समाधानकारक पातळीवर पोहचला. नाशिक येथे मागील वर्षी या दिवशी निर्देशांक १४२ होता, तर यावर्षी त्यात मोठी घट होऊन ३१ या चांगला पातळीपर्यंत आला.


हेही वाचा -

ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक पाऊस

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा