Advertisement

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस

बेस्ट प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानापोटी प्रत्येकी ९ हजार १०० रुपये जमा झाले.

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस
SHARES

दिवाळीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांनी बोनस देण्यात आला. मात्र, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला नव्हता. बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसवर चर्चा करण्यात आली. मात्र राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं त्यांचा बोनस प्रश्न निकाली लागत नव्हता. त्यामुळं हे सर्व कर्मचारी बोनसच्या प्रतिक्षेत होत. परंतु, आता या कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपली.

दिवाळी बोनस

बेस्ट प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानापोटी प्रत्येकी ९ हजार १०० रुपये जमा झाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिल्यामुळं बेस्टच्या तिजोरीवर ३८ कोटींचा भार पडला आहे. परंतु, कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे.

सामंजस्य करार

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर झालं होतं. मात्र, सुधारित वेतनाच्या सामंजस्य करारावर सही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळेल, अशी नोटीस प्रशासनानं काढली होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळंही सानुग्रह अनुदान वाटप अडचणीत आलं होतं.



हेही वाचा -

ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक पाऊस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा