Advertisement

डोंबिवलीतील लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली स्थानकात रेल्वे फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

डोंबिवलीतील लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत
SHARES

सकाळच्या ‘आॅफिस अवर’मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली स्थानकातून लोकल ट्रेन पकडायची म्हणजे महाकर्मकठीण बाब. रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही या गर्दीवर उपाय शोधण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेलं नाही. याची दखल घेत राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली स्थानकात रेल्वे फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा- नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाला यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्या म्हणतात डोंबिवलीला येणारी लोकल ट्रेन ही कल्याणवरून सुटते. ही ट्रेन तिथूनच प्रवाशांच्या गर्दीने भरून येत असल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढताच येत नाही. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अद्याप तोडगा काढण्यात आलेला. 

नियम ३७७ अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार सुळेंनी हा मुद्दा उपस्थित करून डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement