Advertisement

‘या’ जिल्ह्याचं नाव बदलून राजगड करा, सुप्रिया सुळेंची मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्याचं नाव बदलून राजगड असं करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

‘या’ जिल्ह्याचं नाव बदलून राजगड करा, सुप्रिया सुळेंची मागणी
SHARES

बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्याचं नाव बदलून राजगड असं करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. याआधीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र लिहून ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- नरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का? निलम गोऱ्हेंचा सवाल

आपल्या ट्विटर हँडलवर टाकलेल्या मॅसेजमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे यासाठी मी पाठपुरावा करीत आहे.याबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करुन वेल्हे तालुक्यास राजगड हे नाव द्यावे.

छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला.स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. 

मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. 

विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. 

हेही वाचा- सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा, न शिकवल्यास १ लाखांचा दंड

हे सर्व मुद्दे लक्षात घेता @CMOMaharashtra वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा