Advertisement

आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळे जखमी


आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळे जखमी
SHARES

रास्तारोको आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपूर शहराच्या प्रवेशद्वारातच सरकारच्या विरोधात 'हल्लाबोल पदयात्रा काढली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे शांततेत आंदोलन करत असतानादेखील नागपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. 


सुप्रिया सुळेंच्या हाताला दुखापत

या आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत झाली. पण उपचारासाठी त्यांना कोणत्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं याची माहिती अद्याप मिळालेली नाही.


मंत्र्यांची अटक सुटका

रास्तारोको आंदोलन करताना नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार संदीप बजोरिया आणि अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करत काही वेळातच सोडून देण्यात आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement