Advertisement

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची आॅफर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवरील आमदारकीची आॅफर देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची आॅफर
SHARES

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवरील आमदारकीची आॅफर देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीकडून असा प्रस्ताव आलेला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. 

राज्यपाल नियुक्त जागा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच रिक्त होणार आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ जागा येण्याची शक्यता आहे. त्यातील एका जागेवर राजू शेट्टी यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी तयारी झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजू शेट्टी यांना आमदारकी मिळावी यासाठी आग्रही असल्याचं समजत आहे. त्यामुळे शरद पवार लवकरच राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

हेही वाचा - कदाचित राज्यपालांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान- शरद पवार

आमदारकीचा प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत जयंत पाटील यांनी शेट्टी यांना विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव दिल्याचं समजत आहे. 

मात्र आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील यांनी आपली भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची एक जागा देण्यात येईल तसंच विधानसभा निवडणुकीच्या वेळेस स्वाभिमानीसाठी एक जागा सोडण्याचं ठरलं होतं. हे आश्वासन कसं पाळायचं हे सर्वस्वी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अवलंबून असल्याचं अनौपचारीक गप्पांमध्ये जयंत पाटील यांना सांगितलं. सोबतच शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच या आॅफरवर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. 

आघाडीशी जवळीक

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या शेट्टी यांनी भाजपपासून फारकत घेत पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जवळ आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी देखील झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेट्टी यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आॅफर राजू शेट्टी स्वीकारतात की नाही, याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा