Advertisement

कदाचित राज्यपालांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान- शरद पवार

राज्यपालांचं मत जर परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात असेल, तर कदाचित त्यांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान असू शकेल, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी हाणला.

कदाचित राज्यपालांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान- शरद पवार
SHARES

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. परंतु या परीक्षा घेण्यात याव्यात, यावर ठाम असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मात्र हा निर्णय पटलेला नाही. राज्य सरकारने याबाबत मनमानी केल्याचं म्हणत कोश्यारी (coronavirus live updates ncp chief sharad pawar slams maharashtra governor bhagat singh koshyari over university final year exams ) यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारी यांना चिमटा काढला. 

निर्णय चुकीचा नाही

शरद पवार यांनी बुधवार १० जून २०२० रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना महाराष्ट्रातील परीक्षांबाबतच्या या वादावर प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

भारतातील नामांकित विद्यापीठं तसंच खाजगी विद्यापीठं देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असतील, तर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अगदीच चुकीचा आहे, असं होत नाही. राज्यपालांचं मत जर या निर्णयाविरोधात असेल, तर कदाचित त्यांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान असू शकेल, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी हाणला. 

हेही वाचा - फायनल इयरची परीक्षा रद्द केल्यामुळे राज्यपाल नाराज, लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा देऊ न शकलेल्या या विद्यार्थ्यांना आधी झालेल्या सर्व सेमिस्टरमध्ये त्यांना मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देत उत्तीर्ण केलं जाणार आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना न पटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मनमानी असल्याचा आक्षेप घेतला होता.

भवितव्य धोक्यात 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार कुलपतींना आहेत. कोणत्याही कायदेशीर बाबी आणि परिणामांचा विचार न करता परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याचा मनमानी निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल, असं आपली नाराजी दर्शवणाऱ्या पत्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा