Advertisement

राष्ट्रवादीने केलं मुंबईतील खड्डयांचं बारसं


राष्ट्रवादीने केलं मुंबईतील खड्डयांचं बारसं
SHARES

मुंबईतील रस्त्यांवर खड्डयांची संख्या वाढत चालल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने घाटकोपरमध्ये आंदोलन करत मुंबई महापालिकेविरोधात नाराजी नोंदवली. रस्त्यांवरील खड्डयांना आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांची नावे देत हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं.


कुठे केलं आंदोलन?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. घाटकोपर पूर्वेकडील यशवंत शेठ जाधव मार्गावर खड्ड्यांच्या नामकरणाचा सोहळा पार पाडला. या सोहळ्यात प्रत्येक खड्डयांचं बारसं करण्यात आलं. यामध्ये महापालिका आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) अशी नावं ठेवण्यात आली. प्रत्येक खड्डयांभोवती पाळणा जोजावत सर्वांना पेढे वाटण्यात आले.



तीव्र आंदोलन करणार

यंदा खड्डे पडणारच नाही असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला होता. तरीही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे महापालिका प्रशासनाचं अपयश आहे. महापालिकेने प्राधान्य १,२ व ३ ची जी कामे तसंच खडड्यांची कामे हाती घेत पूर्ण केली तरीही खड्डे पडतातच कसे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी केला. हे खड्डे लवकर न बुजवल्यास खड्ड्यांमध्ये नामकरणाचे मोठे फलक लावून तीव्र आंदोलन हाती घेतलं जाईल, असा इशारा जाधव यांनी दिला.



हेही वाचा-

मुंबईतल्या खड्ड्यांवरून केंद्र सरकारची 'सर्वोच्च' कानउघडणी

कल्याणनंतर नवी मुंबईतही खड्ड्याचा बळी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा