Advertisement

कल्याणनंतर नवी मुंबईतही खड्ड्याचा बळी


कल्याणनंतर नवी मुंबईतही खड्ड्याचा बळी
SHARES

मुंबईसह ठाणे, कल्याण परिसरात खड्डेच खड्डे झाले असून हे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत पाच जणांचा बळी गेला आहे. आता त्यानंतर स्मार्टसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील रस्त्यांवरही खड्डे झाले असून हे खड्डेही जीवघेणे ठरत आहेत.

शुक्रवारी नवी मुंबईतील सायन-पनवेल मार्गावरील तुर्भे येथील हुंदाई शोरूमजवळ खड्ड्यात पडल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नेरूळ येथील डाॅ. डी. वाय पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 


जीव मुठीत घेऊन प्रवास

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा सायन-पनवेल महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग असून सध्या या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. तर गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळं खड्ड्यांचं प्रमाण वाढलं असून वाहनचालकांना-प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. अखेर शुक्रवारी या मार्गावरील खड्ड्याने एका तरूणाचा बळी घेतला आहे. सनी विश्वकर्मा (२७) आणि कमलेश यादव हे दोघे तुर्भे येथील सायन-पनवेल मार्गावरून दुचाकीनं जात होते. त्यादरम्यान रस्त्यात खड्डा आला आणि हे दोघे खड्ड्यात पडले. यात सनी विश्वकर्मा याचा मृत्यू झाला असून कमलेश यादव गंभीर जखमी झाला आहे.


खड्डे ८ दिवसांत बुजवण्याचे आदेश 

कल्याणमध्ये खड्ड्यात पडून मृत्यू होण्याचं सत्र सुरूच असून शुक्रवारीच कल्याण येथील गांधारी पुलावरील खड्ड्यात पडून कल्पेश जाधव या तरूणाचा मृत्यू झाला होता. कल्पेशच्या मृत्यूमुळं कल्याण इथं खड्ड्यात पडून बळी जाणाऱ्यांची संख्या ५ वर गेली आहे. असं असताना प्रशासनाला मात्र काही जाग आलेली नाही. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील खड्डे आठ दिवसांत बुजवण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांना दिले आहेत. आता नवी मुंबईतही खड्ड्यांचा पहिला बळी गेला असून नवी मुंबईतील, सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्नही एेरणीवर आला आहे.



हेही वाचा -

कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी

व्हाॅट्सअॅपवर नजर की नजरकैद? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकावर संतापलं



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा