Advertisement

बोरीवलीत बांगड्या ठेवून मोदींचा निषेध


बोरीवलीत बांगड्या ठेवून मोदींचा निषेध
SHARES

बोरीवली स्टेशनच्या बाहेर हुतात्म्यांना राष्ट्रावादी काँग्रेसच्या उत्तर जिल्हा मुंबईच्या महिला कार्यकर्त्या फहमीदा हुसैन यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्या जागेवर लिफाफा आणि बांगड्या ठेवत मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली.जवानांच्या एका डोक्याच्या बदल्यात दहशतवाद्यांची दहा डोकी आणू अशी घोषणा करणारे मोदी आता गेले तरी कुठे? असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विचारला. गेल्या चार महिन्यात 274 जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच करू शकले नाहीत असं सांगत राष्ट्रवादीने भाजपा सरकारचा निषेध केला. यावेळी मेणबत्ती लावून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय