राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष काम करणार - तटकरे

  CST
  राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष काम करणार - तटकरे
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निकालाबाबत आढावा घेण्यात आला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष काम करणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

  निवडणुकांच्या काळात शिवसेना-भाजपा या पक्षांशी कोणत्याही प्रकारची आघाडी करायची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही गोष्ट शेवटपर्यंत पाळली. आम्ही जो आढावा घेतला त्यात भाजपाला तीन जिल्हा परिषदांवर सत्ता मिळाली आहे. दोन जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश आले आहे. काँग्रेसला सिंधुदुर्ग येथे स्पष्ट बहुमत मिळाले, शिवसेनेला रत्नागिरीत यश मिळाले. काही जिल्ह्यांमध्ये त्रिशंकू अवस्था आहे, अशा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ देणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

  येत्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणखी एक बैठक होईल. या बैठकीत बुथनिहाय, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर पक्ष संघटन कसं मजबूत करता येईल यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.