Advertisement

महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन


महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
SHARES

आंतराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑईलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात आले. हातगाडीवर दुचाकी बांधून तर चारचाकी ओढत राष्ट्रवादीच्या महिलांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले.

महागाई कमी करण्याचे आश्वासन देत भाजपाप्रणित एनडीए सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. भाजपा सरकार 'अच्छे दिन'चा ढोल बडवत स्वत:चीच पाठ थोपटून घेत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.



पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुगीचे दिवस येणार आहेत? हे सरकारने जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम सरकारने बंद करावे, असा इशारा दिला. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा