Advertisement

मालाडमध्ये रोजगार मेळावा


मालाडमध्ये रोजगार मेळावा
SHARES

मालाड - मालाड पूर्वेकडील कोकणीपाडा येथील नर्मदा हॉलमध्ये रविवारी कौशल्य व रोजगार मेळावा संपन्न झाला. बेरोजगार तरुणांना कौशल्यासहीत रोजगार मिळवून देण्यासाठी ओमकार फाउंडेशनच्यावतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याला कुरारमधील जवळपास 1 हजारांहून अधिक तरुणांनी उपस्थिती लावली. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर शिक्षण आणि चांगल्या वेतनाची नोकरी या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणार असल्याचे उत्तर मुंबई जिल्हयाचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement