कुंभारवाड्यात राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन

  Kumbharwada
  कुंभारवाड्यात राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन
  मुंबई  -  

  दोन टाकी - चोर बाजार, बोरी मोहल्ला येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. प्रभाग क्रमांक 220 मधील या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. 220 चे उमेदवार रूपेश खांडके आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  या वेळी सचिन अहिर यांनी प्रभाग क्र. 220 च्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले. गेल्या कित्येक वर्षांपासून कुंभारवाडा हा प्रभाग शिवसेनेचा बाल्लेकिल्ला होता. पण, आता कुंभारवाड्यात राष्ट्रवादीचाच झेंडा फडकायला हवा, यासाठी आम्हाला तुमची गरज आहे असे आवाहन नागरिकांना सचिन अहिर यांनी केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.