एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांना एकूण 785 पैकी 516 मते मिळाली, तर यूपीएचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली.
विशेष म्हणजे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी 14 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे 785 पैकी 771 खासदारांनीच मतदान केले.
संख्याबळ लक्षात घेतले तर एनडीएचे व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित मानला जात होता. दोन्ही सभागृहात मिळून 785 खासदार आहेत. मात्र सध्या लोकसभेच्या दोन, तर राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. शिवाय भाजपाचे लोकसभा खासदार छेदी पासवान यांना एका न्यायालयाच्या निकालामुळे मतदान करता आले नाही.
दरम्यान नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची दिल्लीत भेट घेऊन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.
लोकसभेच्या 545 जागांपैकी भाजपाकडे 281 तर एनडीएकडे 338 इतके संख्याबळ आहे. राज्यसभेतही भाजपा 58 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. एनडीएत नसलेले तेलंगणा राष्ट्र समिती, एआयडीएमके, वायएसआर काँग्रेस या तीन्ही पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत एनडीएलाच मतदान केले.
हे देखील वाचा -
कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)