Advertisement

प्रकाश मेहतांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा; काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती.

प्रकाश मेहतांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा; काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी
SHARES

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.


२०१८ मध्ये अखेरची सुनावणी

ऑक्टोबर २०१८ ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती असं समजल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असं सांगण्यात आल्याचंही ते म्हणाले.

२ वर्षे होत आली

या संदर्भात चौकशी सुरु होऊन २ वर्षे होत आली व सुनावणी होऊन ६ महिने झाले पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा अपेक्षा असल्याचं सावंत म्हणाले.




हेही वाचा -

'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा

शीव परिसरातून ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा