Advertisement

'अशांतता पसरवणारे भाजपचे कार्यकर्ते'


'अशांतता पसरवणारे भाजपचे कार्यकर्ते'
SHARES

नरिमन पॉइंट – 'नाशिकमधील अशांतेतेतचे पडसाद पुण्यात उमटले आहेत. या अशांतेच्या पाठीमागे नेमक कोण आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे. ही अशांतता पसरवणारे इतर कोणी नसून भाजपचे कार्यकर्ते, समाजकंटक आहेत', अशी टीका शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी केली.
'गोऱ्हे म्हणाल्या तळेगाव 9 ऑक्टोबरला जी घटना घडली. त्यात पीडित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे विधान पालकमंत्र्यांनी केले आहे. घाईने विधान केल्याने लोकांमध्ये खूप अस्वस्था पसरली, त्याचे पडसाद उमटले. बलात्कारासारखा गंभीर विषय असताना अशी घोषणा पालक मंत्र्यांनी करणे योग्य नव्हते', असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
'मुख्यमंत्री शांतता राखण्याच प्रयत्न करत आहेत, मात्र अशांतता निर्माण कऱणाऱ्या शक्तीचे सूत्रधार त्यांच्या आसपासच सापडतील. गणेश पांडे प्रकरणी महिला आयोग चौकशी करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिले होते. मात्र राज्य महिला आयोगाच्या चौकशीचा काय निकाल लागला. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही . तसेच बलात्कार कुठल्या कुटुंबातील मुलीवर झाला आहे. त्यानुसार प्रतिक्रिया येणे योग्य नाही, प्रत्येक स्त्रीवर झालेला अत्याचार ही गंभीर बाब आहे', गोऱ्हे यांनी सांगितले. त्यासाठी शिवसेना दामिनी पथक तयार कऱण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा