नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती?

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्यानं शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

SHARE

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्यानं शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत दुसरा कोणी उमेदवार न आल्यास नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर येतं आहे. शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांचं नाव उपसभापती पदासाठी निश्चित केलं आहे.

बिनविरोध निवड

सभागृहाचं कामकाज सोमवारी सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहेत. सोमवारी दुपारपर्यंत उपसभापतीपदासाठी अर्ज भरता येणार आहे. नीलम गोऱ्हे वगळता इतर कोणत्याही उमेदवाराचं नाव न आल्यास त्यांची या पदी बिनविरोध निवड होणार असून मंगळवारी नवीन उपसभापतींचं नाव घोषित करण्यात येणार आहे.

काँग्रेसची कोंडी

१७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे होते. परंतु, त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे. मात्र, काँग्रेस संख्याबळाच्या जोरावर या पदावर दावा करत असून, विजय वडेट्टीवार यांचं नावही विरोधीपक्षनेतेपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं निश्चित केलं आहे. तसं पत्रंही काँग्रेस-राष्ट्रवादीनं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिलं आहे. दरम्यान, त्यावर 'शिवसेना-भाजपनं उपसभापतीपद आम्हाला द्या अन्यथा विरोधीपक्षनेतेपद देणार नाही', असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळं विरोधीपक्षनेतेपद देण्यासाठी शिवसेना-भाजपनं कोंडी केल्यानं काँग्रेसनं उपसभापतीपदावरचा दावा सोडल्याचं समजतं आहे. 

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची आणि विरोधीपक्षनेतेपदाची घोषणा एकाच दिवशी करण्यात येणार आहे. त्यामुळं नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी होणार का? तसंच, विरोधीपक्षनेतेपदा कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मुंबईत मंगळवारी होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याचा अंदाज

पाण्याचं बिल थकवल्यानं मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर यादीतसंबंधित विषय
ताज्या बातम्या