तेजस ठाकरेचं 'चल मेरे भाई'

  Pali Hill
  तेजस ठाकरेचं 'चल मेरे भाई'
  मुंबई  -  

  मुंबई - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राजकीय प्रवासात साथ देण्यासाठी त्यांचा धाकटा भाऊ तेजस ठाकरे सज्ज झालाय. वडील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे कुलोत्पन्न तेजस मुंबईतल्या शिवसेना शाखांना भेटी देताना दिसतोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं तेजसला बहुतेक राजकारण प्रवेशाचा मुहूर्त साधायचाय.

  21 वर्षाच्या तेजसवर अद्याप पक्षाची कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. शिवसेना आणि युवासेनेचा 'पोस्टर बॉय' असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या जोडीला तेजसची छबी यापूर्वी पक्षाच्या होर्डिंग्जवर अनेकदा दिसलीय. आता त्याने 'मैदानी' राजकारणाचं 'बाळकडू' शिकायला सुरुवात केलीय, याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे देतायत.
  प्रबोधनकारांकडून समाजकारणाचे धडे गिरवणाऱ्या दिवंगत बाळासाहेबांनी राजकारणातल्या घराणेशाहीला कायम विरोध केला. त्यांच्या हयातीतच ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात जोशात दाखल झाली होती. आता तिसऱ्या पिढीची 'धाकटी पाती' राजकारणात एंट्री करतेय. या नव्या एंट्रीमुळे शिवसेनेला किती फायदा होईल, याचं उत्तर आत्ताच देणं घाईचं ठरेल. पण जुन्याजाणत्या शिवसैनिकांना 'धाकल्या साहेबां'चं मार्गदर्शन लाभेल, हे नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.