महापौर शिवसेनेचाच असणार- उद्धव ठाकरे

वांद्रे - मुंबईचा महापौर आणि पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मुंबईकर मतदारांचे आभार मानले. मराठी बांधवांचे विशेष अभिनंदन करत त्यांनी शिवसेनेला साथ दिली, तसेच इतर समाजाचीही मतेही मिळाली आहेत हे आमचे यश आहे. असे मत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर व्यक्त केले. तसेच भाजपाचे हे यश नाही. भाजपाने ज्या प्रकारे सत्तेचा वापर केला त्यानुसार हवे तसे त्यांना यश मिळाले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचसोबत मुंबईसहित इतर ठिकाणी जे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Loading Comments