Advertisement

‘नाईटलाइफ’ हा शब्दच आवडत नाही- उद्धव ठाकरे

मला मुळातच ‘नाईटलाइफ’ हा शब्द आवडत नाही, पण मुंबईत काही ठराविक ठिकाणी प्रायोगिक स्तरावर 'नाईटलाइफ' ही संकल्पना राबवता येऊ शकते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

‘नाईटलाइफ’ हा शब्दच आवडत नाही- उद्धव ठाकरे
SHARES

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘नाईटलाइफ’ (night life in mumbai) वरून दावे-प्रतिदावे होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी या विषयावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मला मुळातच ‘नाईटलाइफ’ हा शब्द आवडत नाही, पण मुंबईत काही ठराविक ठिकाणी प्रायोगिक स्तरावर 'नाईटलाइफ' ही संकल्पना राबवता येऊ शकते, असं ठाकरे म्हणाले. 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला उपस्थित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘नाईटलाइफ’वर बोलताना म्हणाले की, प्रत्येक शहराची स्वत:ची एक संस्कृती असते. त्यामुळे ‘नाईटलाइफ’ सरसकट राज्यभर राबवणं योग्य होणार नाही. माझ्या मते मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकतो. पण, मुळातच मला ‘नाईटलाइफ’ हा शब्द आवडत नाही, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन

मुंबईतील मॉल्स, हाॅटेल-रेस्टाॅरंट यांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देता येऊ शकते. पण ही परवानगी दिल्यावर परिस्थितीचा आढावाही घ्यावा लागणार आहे. या निर्णयाचे काय परिणाम होत आहेत, ते देखील पाहावे लागणार आहेत. याबाबत कुणाच्या तक्रारी असतील तर त्या देखील ऐकून घ्यावया लागणार आहेत, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

या परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

मुंबईतील अनिवासी भागातील माॅल्स आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट्सना रात्रीच्या वेळेत चालवण्यासाठी परवानगी देण्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांची आहे. यासाठी त्यांनी नुकतीच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी (bmc commissioner pravin pareshi) आणि पोलीस आयुक्त संजय बर्वे (mumbai police commissioner sanjay barve) यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबतची घोषणा केली. या घोषणेनुसार २७ जानेवारीपासून मुंबईतील नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणांव नाईटलाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचा- ‘नाईटलाइफ’मुळे वाढतील बलात्कार, राज पुरोहित यांचा दावा

मात्र या निर्णयावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून यामुळे लेडिज बारला चालना मिळेल, असा दावा भाजप नेते आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी केला आहे. तर राज पुरोहित (raj purohit) यांनी या निर्णयामुळे मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होऊ निर्भयासारख्या घटना घडतील, पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढेल, असं वक्तव्य केलं आहे. 

तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी मात्र या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. ज्यांना हे शहर माहीत नाही, तेच या शहरावर बोलतात, ज्यांचं बालपण या शहरात गेलंय, ज्यांना हे शहर माहितेय, तेच या ‘नाईटलाइफ’चे ( night life in mumbai) पुरस्कर्ते असल्याची मला जाणीव आहे,’ असं ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा