Advertisement

‘नाईटलाइफ’मुळे वाढतील बलात्कार, राज पुरोहित यांचा दावा

मुंबईत ​‘नाईटलाइफ’​​​ (night life in mumbai) सुरू झाल्यास महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होईल’, भाजप नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी असं म्हणत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईटलाइफ’च्या प्रस्तावाला विरोध केला.

‘नाईटलाइफ’मुळे वाढतील बलात्कार, राज पुरोहित यांचा दावा
SHARES

‘मुंबईत ‘नाईटलाइफ’ (night life in mumbai) सुरू झाल्यास महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होईल’, भाजप (bjp) नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी असं म्हणत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईटलाइफ’च्या प्रस्तावाला विरोध केला आहे. 

मुंबईत रात्रीच्या वेळेतही माॅल, दुकाने आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट इ. व्यावसायिक ठिकाणं सुरू राहावीत, यासाठी आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी नुकतीच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे (mumbai police commissioner sanjay barve), मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी (bmc commissioner pravin pardeshi) आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट, माॅल्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि या बैठकीनंतर मुंबईतील अनिवासी भागात २७ जानेवारीपासून हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल्स (hotels and malls) २४x७ सुरू ठेवता येतील, अशी घोषणा केली. 

हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

त्यावर भाजपने (bjp) आक्षेप घेतला. मुंबईत २४X७ हाॅटेल आणि माॅल्स सुरू झाली, तर मुंबई पोलिसांवर अतिरिक्त भार येईल. शिवाय मुंबईत बार आणि लेडिज बारला प्रोत्साहन मिळेल, असा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला.  

एवढंच नाही, तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी पोलिसांवरील ताणाचा मुद्दा उपस्थित करत २२ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ. तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही असं, सांगितल्याने शिवसेनेच्या (shiv sena) गोटात अस्वस्थता पसरली. पण रात्री आदित्य यांनी फोन करून चर्चा करताच देशमुख यांनी अनिवासी भागातील व्यावसायिक हाॅटेल-माॅल सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचा खुलासा केला. 

त्यापाठोपाठ राज पुरोहित (raj purohit) यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबईत २४ तास मॉल, रेस्टाॅरंट आणि पब खुले राहिल्यास मद्यसंस्कृती वाढेल. नाईटलाइफ युवकांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल.  आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊन निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्यात आवश्यक मनुष्यबळ नाही. त्यामुळे अशी संस्कृती भारतासाठी चांगली ठरेल का याचा त्यांनी विचार करायला हवा, असं पुरोहित म्हणाले.

हेही वाचा- मुंबईतील माॅल्स, हाॅटेल २४ तास राहणार खुले, अखेर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने घेतला धडाकेबाज निर्णय

दुसरीकडे नाइट लाइफच्या (night life in mumbai) संकल्पनेचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी समर्थन केलं आहे. मी स्वत: मुंबईतील नाईटलाइफमध्ये जगलो आहे. त्यामुळे नाईटलाइफमुळे पोलिसांवर फार ताण येतो, असं मला वाटत नाही. मुंबईत एक वर्ग असा आहे, ज्याला सोशल लाइफ नाही आणि त्याचं सोशल लाइफ हे नाईटलाइफ असतं. तेव्हा मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला साेशल लाइफ असावं की नसावं, तर माझं म्हणणं आहे असलं पाहिजे. मग त्याच्या सोईने असलं पाहिजे. त्याची सोय ही रात्रीही आहे, त्यामुळे ते सुरू झालं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा