Advertisement

एका दिवसासाठी मुख्यमंत्री असल्याचं विसरा, होऊन जाऊ दे एकदा...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राणे पिता पुत्रांना बेडकाची उपमा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती.

एका दिवसासाठी मुख्यमंत्री असल्याचं विसरा, होऊन जाऊ दे एकदा...
SHARES

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राणे पिता पुत्रांना बेडकाची उपमा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने दुखावलेल्या निलेश राणे यांनी एका दिवसासाठी मुख्यमंत्री असल्याचं विसरा म्हणत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानचं दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी दिशा सालीयनच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा, असं सुनावलं आहे.

नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असं निलेश राणे म्हणाले. (nilesh and nitesh rane criticises cm uddhav thackeray dussehra rally speech)

हेही वाचा - एक बेडूक आणि दोन पोरं.., आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

तर, दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!, असं म्हणत नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना, सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात. मी लहान असताना एक गोष्ट, कविता की गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली. मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय. पण चिरका, किरका आवाज येतोय तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल, होऊच शकत नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रांचं नाव न घेता केली होती.

संबंधित विषय
Advertisement