Advertisement

एक बेडूक आणि दोन पोरं.., आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधून काढलं असतं. पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला.

एक बेडूक आणि दोन पोरं.., आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
SHARES

सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत, असं म्हणत नाव न घेताच सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं. दादर येथील सावरकर स्मारक इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray spoke on politics over sushant singh rajput suicide case and aaditya thackeray in shiv sena dussehra rally speech)

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष होतं. आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि हिंदुत्व आणि बाॅलिवूडवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना फैलावर घेतलं. 

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधून काढलं असतं. पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला. त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागलात?

महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदेश, ठाकरे कुटुंबिय, आदित्यवर चिखलफेक करायला लागलात. तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या. काय झालं? आता तेच शेण आणि गोमुत्राने भरलेलं तोंड, ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा.

तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत, पापी वृत्तीची माणसं आम्ही नाही आहोत. जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय, त्यातलं थोडसं लक्ष तुम्ही देशावर द्या! आज देश रसातळाला चाललाय.

सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात. मी लहान असताना एक गोष्ट, कविता की गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली. मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय. पण चिरका, किरका आवाज येतोय तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल, होऊच शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा