Advertisement

अडवण्याची भाषा करणारे ‘गोमूत्र’वर आले, राणे बंधूंचं शिवसेनेला प्रत्युत्तर

शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता राणे यांनी स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर राणे बंधूंनी ट्विटरवरून प्रहार करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अडवण्याची भाषा करणारे ‘गोमूत्र’वर आले, राणे बंधूंचं शिवसेनेला प्रत्युत्तर
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर, शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देऊ नये म्हणून शिवसेनेकडून आव्हानात्मक भाषा करण्यात येत होती. मात्र शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता राणे यांनी स्मृतीस्थळाला भेट दिलीच. यानंतर राणे बंधूंनी ट्विटरवरून प्रहार करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.  

जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याआधी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवाजी पार्क इथं जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळला भेट देणार असल्याचं सांगितलं जात होतं. ही माहिती कळताच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राणे यांनी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तरी हरकत नाही, पण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी जाऊ देणार नाही. राणे तिथं आले तर त्यांना हाकलून देऊ. बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्याचा राणेंना अजिबात अधिकार नाही, अशा शब्दांत विरोध केला होता. मात्र यावर शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. 

हेही वाचा- नारायण राणे येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

प्रत्यक्षात या विरोधात न जुमानला नारायण राणे जेव्हा शिवाजी पार्क इथं स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना कुणाकडूनही विरोध झाला नाही. परंतु त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून, दुधाचा अभिषेक घातला. दुपारी नारायण राणे स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला होता त्यामुळे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं आप्पा पाटील यांनी सांगितलं.

त्यावर अडवण्याची भाषा करणारे ‘गोमूत्र’वर आले, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी, तर स्व. बाळासाहेबांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही, धमक्यांना भीक घालत नाही आम्ही. निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो. औकातीत राहायचं, अशा भाषेत निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा