कोपर्डीतील आरोपींवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार

 Mumbai
कोपर्डीतील आरोपींवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार
कोपर्डीतील आरोपींवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार
See all

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्रवारी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुंबईत केला आहे. तसेच या कार्यकर्त्यांना जी मदत लागेल ती करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. तसं सांगणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

कोपर्डी येथे 13 जुलैला तिघा नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे पडसाद सर्वच स्तरातून उमटले होते. यातील तीन नराधमांना शिक्षाही सुनावण्यात आली होती. मात्र त्याचवेळी शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमांवर हल्ला केला होता.

Loading Comments