नितेश राणेंनी कामगारांचाही विचार करावा - दमानिया

सीएसटी - खंबाटा एव्हिएशन विरोधात आझाद मैदान इथे कामगारांनी आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेली अनेक वर्ष खंबाटा कंपनीसाठी कामगारांनी घाम गाळला. कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. पण याच्या मोबदल्यात कामगारांच्या हाती आली ती फक्त निराशाच. गेल्या वर्षी खंबाटा कंपनीने  अनेक कामगारांना कामावरून कमी केले. पण त्यांच्या मेहनतीचा मोबदला मात्र दिला नाही. कामगारांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी लढावं लागत आहे.

महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्यामुळे खंबाटा कंपनीतल्या कामगारांचे नुकसान झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

नितेश राणे यांनी हे सर्व आरोप फेटाळत शिवसेनेला लक्ष्य केले. अंजली दमानिया मातोश्रीवर गेल्यांनंतर माझ्यावर हे आरोप करत आहेत. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे लोकांना समजत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Loading Comments