Advertisement

मुंबईत लष्कर येणार नाही, अखेर मुख्यमंत्र्यांनाच करावा लागला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना अखेर पुर्णविराम दिला आहे.

मुंबईत लष्कर येणार नाही, अखेर मुख्यमंत्र्यांनाच करावा लागला खुलासा
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना अखेर पुर्णविराम दिला आहे. लष्कर रस्त्यावर यायची काहीच गरज नाही. तुम्हीच सैनिक आहात, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिला.


नागरिकच लष्कर आहेत

"केंद्र सरकारला विनंती आहे की, पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. केंद्र सरकारकडे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मागावं लागेल. याचा अर्थ लष्कर आणलं असं नाही. मुंबईत लष्कर येणार ही अफवा आहे. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाच्या संकटाचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. या शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज येता कामा नये. माझा प्रत्येक नागरिक सैनिक आहे आणि जवान आहे. त्यामुळे आपण सहकार्यातून या संकटावर मात करू, असं ते म्हणाले.


मजुरांच्या मृत्युनं व्यथित - मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्युविषयी मुख्यमंत्री म्हणाले, "अफवांना बळी पडू नका. आजच्या घटनेतही अफवेचेच बळी ठरले. भुसावळला हे कामगार रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले होते. भुसावळहून ट्रेन सुटेल हे त्यांना कुणी सांगितलं? औरंगाबादहून गाडी निघणार होते. करमाड गावात थकून बसले. डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाला आला."


रुग्णालय प्रकरणावर काय म्हणाले?

हॉस्पिटलमधला गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही. काल या संदर्भातल्या घटना समोर आल्या. पण त्याचबरोबर डॉक्टरवर हल्ले होता कामा नये. महापालिका, सरकार सोबत आहे, पण कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. गलथानपणाला क्षमा केली जाणार नाही.


लॉकडाऊन वाढणार का?

पिंजऱ्यात बसल्यासारखं आहे. आत्ता ते बसण्याची गरज आहे. पण लॉकाडाऊनची शिस्त काही ठिकाणी बिघडलेली दिसते. हे बंध तोडायला बघाल तर ते आणखी आवळत जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. हात जोडून विनंती करायची आहे, की निर्बंध पाळा. कारण लॉकडाऊन संपवणं तुमच्या हाती आहे, असं ते म्हणाले.



हेही वाचा

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

परप्रांतीयांच्या शोधासाठी भरारी पथकं नेमा, शरद पवारांची सूचना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा