Advertisement

घाटकोपरमध्ये मतदान केंद्रावर कोणतीही व्यवस्था नाही


घाटकोपरमध्ये मतदान केंद्रावर कोणतीही व्यवस्था नाही
SHARES

घाटकोपर - प्रभाग 126 मध्ये लिटील फ्लॉवर इंग्रजी हायस्कूलमध्ये मतदानासाठी लोकांची गर्दी पहायला मिळाली. रखरखत्या उन्हात रांगेत उभे राहूनही नंबर न आल्याने मुंबईकर त्रस्त झाल्याचं चित्र अमृतनगर येथील लिटील फ्लॉवर इंग्रजी हायस्कूलमध्ये दिसून आले. प्रशासनाकडून मतदारांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

या मैदानात लोकं रांगेत उभे असून शाळेच्या मैदानात छत नाही. मतदारांना पाण्याची सोय केली नाही. तसंच मतदानासाठी देण्यात आलेल्या खोल्यांचा आकार लहान असल्यामुळे गर्दी वाढलीय. या मतदान केंद्रावर एकूण 8 बुथ असल्यामुळे गोंधळ होत असल्याचं केंद्र अधिकारी यांनी सांगितलं. प्रभाग 123 आणि 126मध्ये आत्तापर्यंत 25 टक्के मतदान झाले आहे.

संबंधित विषय
Advertisement