आचारसंहितेला राजकीय पुढाऱ्यांचा हरताळ

BEST depot, Mumbai  -  

मुंबई - मुंबईत आचारसंहिता असतानाही बॅनर झळकतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा कुलाबा परिसरात हे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे आचारसंहितेलाच या राजकीय पुढाऱ्यांनी हरताळ फासल्याचे स्पष्ट झालंय.

दरम्यान ए वॉर्ड पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी आचारसंहिता पथक सुरु केलय, त्यांची संपूर्ण शहरात बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई सुरु आहे. प्रथम आधी लावलेले बॅनर काढण्याची कारवाई सुरु आहे, त्यानंतर जे बॅनर लावले जातील त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना दिली.

Loading Comments