Advertisement

प्रभारी सचिवांच्या खांद्यावर मराठी भाषा विभागाचा भार


प्रभारी सचिवांच्या खांद्यावर मराठी भाषा विभागाचा भार
SHARES

मराठी भाषा विभागाला अद्याप पूर्णवेळ सचिवच उपलब्ध नाही. त्यामुळे या विभागाची धुरा सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. परिणामी मराठी भाषा विभागातील बहुतेक सर्वच महत्त्वाचे खोळंबलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या विभागातील ४० टक्के पदे रिक्त असल्याची देखील माहिती आहे. यावरून मराठी दिन साजरा करताना स्वत:च्याच राज्यात मराठी किती 'दीन' आहे याची प्रचिती मिळत असल्याचा टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.


मराठी भाषा विभागाची धुरा प्रभारींकडे

मराठी भाषा विभागाला सध्या पूर्ण वेळ सचिव उपलब्ध नसल्याने या विभागाची धुरा प्रभारी सचिव भूषण गगराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त असून त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.
भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त असल्याने मराठी भाषा विभागाचा गाडा नक्की ओढतोय कोण? हा सवाल अनुत्तरीतच आहे.


अधिकाऱ्यांना मराठीचे वावडे

मंत्रालयातील सचिव, अधिकारी इंग्रजीतून कामकाज करतात. मुख्यमंत्रीही अनेक कार्यक्रमामध्ये हिंदी, इंग्रजी भाषेत बोलतात. त्यामुळे राज्यात सत्ताधाऱ्यांकडूनच मराठी भाषेची उपेक्षा सुरु असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.


इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मातृभाषेशीवाय इतर भाषेत भाषण करत नाहीत. मात्र आपले मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात. यापेक्षा दुर्दैवी काहीही नाही. यामुळे मंत्रालयातील अधिकारीही मराठीत कामकाज करण्याऐवजी इतर भाषेत करण्याला प्राधान्य देतात. राज्यात मराठीची अवस्था काय आहे? हे यावरूनच स्पष्ट होतं.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा