अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास विरोध नाही, भुजबळांनी केला खुलासा

​अजित पवार​​​ यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याला माझा विरोध असण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

SHARE

कुणाला कुठलं खातं द्यायचं याचा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याला माझा विरोध असण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही आहेत. तर पक्षातून बंड करून भाजपात गेलेले आणि पुन्हा स्वगृही परतलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास पक्षात चुकीचा संदेश जाईस असं पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे.

हेही वाचा- फडणवीसांसोबत ‘हवापाण्यावर’ चर्चा केली- अजित पवार

त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, भुजबळ म्हणाले, भाजपकडे गेलेल्या अजित पवार यांची मनधरणी करून त्यांना परत आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना माझा विरोध असण्याचा प्रश्नच नाही. राहिला प्रश्न उपमुख्यमंत्रीपदाचा तर हे पद कुणाला द्यायचा याचा पूर्ण अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे. ते जे निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. 

असं म्हणत भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपदावरुन सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या