फडणवीसांसोबत ‘हवापाण्यावर’ चर्चा केली- अजित पवार

काही दिवसांपूर्वी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्ता स्थापनेच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले.

  • फडणवीसांसोबत ‘हवापाण्यावर’ चर्चा केली- अजित पवार
SHARE

काही दिवसांपूर्वी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्ता स्थापनेच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले. निमित्त होतं अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न. यावेळी दोघांनी चक्क एकमेकांसोबत गप्पाही मारल्या. त्यासंदर्भात विचारलं असता आमच्या दोघांत हवापाण्याविषयी गप्पा मारल्याचं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- नागरिकत्व विधेयक की ‘व्होट बँके’चं राजकारण? शिवसेनेने केलं मोदी, शहांना लक्ष्य

संजय शिंदे यांच्या मुलाचं शनिवारी सोलापूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं. या लग्नाला राजकारणातील बड्या मंडळींनी हजेरी लावली होती. शिंदे हे अजित पवार यांच्या मर्जीतले आमदार असल्याने सहाजिकच पवार या लग्नसोहळ्याला आवर्जून हजर होते. त्यांच्या शेजारच्या सोफ्यावरच देवेंद्र फडणवीस बसले होते. या दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली. 

याविषयी माध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, 'संजयच्या मुलाचं लग्न असल्याने त्याने माझ्यासह इतर नेत्यांनाही आग्रहाने बोलावलं होतं. लग्न समारंभात खुर्च्या अशा पद्धतीने मांडल्या होत्या की माझी आणि फडणवीस यांची खुर्ची शेजारी शेजारीच होती. शेजारी बसलो म्हणजे लगेच काही सुरू झालं असं समजण्याचं कारण नाही. शेजारी बसून आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो.' 

अजित पवार यांनी या गप्पांबद्दल माहिती दिली असली, तरी राजकीय वर्तुळात दिवसभर या भेटीचीच चर्चा होती. हेही वाचा- 

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटील यांचा दावा

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीची क्लीनचिटसंबंधित विषय
ताज्या बातम्या