दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीत भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीवर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झालीच नाही, असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी केला.
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या पुढाकारातून दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक आयोजित केली होती. राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती माजिद मेमन यांनी दिली.
हेही वाचा- भाजपविरोधी आघाडीसाठी पवारांची खेळी, होणार सर्वपक्षीय बैठक
आज दिल्ली में @NCPspeaks के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहब के निवास पर राष्ट्र मंच की सभा यशवंत सिन्हा जी की पहल पर आयोजित की गई थी। राष्ट्र मंच के संस्थापक सदस्य होने के कारण हमने इसका आयोजन किया था। इस बैठक मे कोई राजनितीक चर्चा नही हुई।
— NCP (@NCPspeaks) June 22, 2021
-माजिद मेमन, वरिष्ठ नेता, एनसीपी pic.twitter.com/SCxk753iLF
सध्याच्या स्थितीत देशात जे राजकीय आणि आर्थिक वातावरण तयार झालं आहे, ते ठिक करण्यासाठी राष्ट्रमंच काय करू शकतो, यावर बैठकीत विचारविनिमय झाला. सर्व सदस्यांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. या बैठकीत जावेद अख्तर, न्या.ए.पी.शाह यांच्यासारखे बिगर राजकीय व्यक्ती देखील उपस्थित होते. सर्वांनी आपलं म्हणणं समोर ठेवलं, असं माजिद मेमन यांनी सांगितलं.
देशात भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शरद पवार आणि राजनितीकार प्रशांत किशोर यांची भेट झाली. त्यापाठोपाठच पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रमंचची बैठक पार पडल्याने तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना बळ मिळालं.
त्यातच या बैठकीत आगामी लोकसभा अधिवेशनाबाबत तसंच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील विरोधक पक्षांची एकजूट करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होईल. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार आहेत, अशी माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली होती. त्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
(no political discussion in rashtra manch meeting says ncp leader adv majeed memon)
हेही वाचा- विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून