Advertisement

शिवाजी पार्कमध्ये कुणाचाच सेल्फी पॉईंट नाही


शिवाजी पार्कमध्ये कुणाचाच सेल्फी पॉईंट नाही
SHARES

दादर - शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉईंटसाठी शिवसेना, भाजपा आणि मनसेला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर महापालिकेकडून ही परवानगी रद्द करण्यात आली आहे. दादर भागातील शिवाजी पार्कमध्ये असलेला सेल्फी पॉईंट तरुणांसह सर्वांसाठीच आकर्षणाचं केंद्र ठरला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून यावरुन शिवसेना, मनसे आणि भाजपाकडून जोरदार राजकारण सुरु झाले होते. सुरुवातीला मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, तो आणखी आकर्षक करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर भाजपाने संधी साधून यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळवली होती.

तर दुसरीकडे शिवसेनेनंही सेल्फी पॉईंटची जबाबदारी स्वीकारत शिवाजी पार्कात बॅनरबाजी केली होती. शिवाय यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी बॅनर लावून जाहीर केले होते. त्यामुळे या प्रकरणात मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांची गोची झाली होती. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत शिवाजी पार्कवरील वॉर्ड ऑफिसरच्या कार्यालयात धाव घेतली. तसेच शिवसेना आणि भाजपाला एकाच दिवसात परवानगी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित करून वॉर्ड ऑफिसरला धारेवर धरले होते. त्यामुळे सेल्फी पॉईंटवरुन सुरु झालेल्या राजकारणाला आता स्थानिकांनीही विरोध केला आहे. तसेच आपले निषेधाचे पत्रही वॉर्ड ऑफिसरना दिले. त्यामुळे महानगरपालिकेने यावर निर्णय घेत सर्वच पक्षांच्या सेल्फी पॉइंटची परवानगी रद्द केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा