उद् घाटनानंतरही मुलुंडचं उद्यान बंदच

 Dalmia Estate
उद् घाटनानंतरही मुलुंडचं उद्यान बंदच

मुलुंड - नगरसेविका सुजाता पाठक यांनी यांच्या नगरसेवक निधीतून मुलुंडमधील चिंतामणराव देशमुख उद्यानाची संपूर्ण दुरुस्ती झाली. 29 डिसेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पणही झालं. पण उद् घाटन झाल्यानंतर 4-5 दिवस उलटले तरीही हे उद्यान नागरिकांसाठी खुलं झालेलं नाही. अजूनही दुरुस्तीचं अंतिम टप्प्यातलं काम सुरूच आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी या उद्यानाचं उद् घाटन घाईघाईनं करण्यात आलं. आचारसंहिता लागू झाल्यावर उद् घाटन शक्य झालं नसतं, म्हणून ही घाई करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अजून 4-5 दिवसांत उद्यान नागरिकांसाठी खुलं होईल, अशी माहिती नगरसेविका सुजाता पाठक यांनी दिली.

Loading Comments