Advertisement

मालाडमध्ये महिला राज


मालाडमध्ये महिला राज
SHARES

मालाड - येत्या महापालिका निवडणुकीत मालाडमध्ये 2 प्रभाग वाढले आहेत. पी उत्तर पालिकेमध्ये 2017च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकांचा आकडा 16 वरून 18वर गेलाय. महापालिकेने केलेल्या प्रभाग पुर्नरचनेत अनुसुचित जाती जमाती महिलांसाठी 4 जागा तर सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी 5 जागा या वॉर्डमध्ये आरक्षित केल्या आहेत. पूर्वी पी उत्तर वॉर्डमध्ये एकूण 4 महिला नगरसेविका होत्या. त्यांची संख्या प्रभाग पुर्नरचनेमुळे 9 वर गेली आहे. त्यामुळे मालाडच्या पी उत्तर वॉर्डमध्ये आगामी महापालिकेत महिला राज असणार आहे. शिवसेना आणि भाजपची सत्ता असलेल्या पी उत्तर वॉर्डमध्ये महिला आरक्षण आल्यामुळे नगरसेवक आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून उभे करण्याची दाट शक्यता आहे.

46, 47 हे नव्याने निर्माण झालेले प्रभाग आहेत. त्यातील नवीन प्रभाग 46 हा अनुसुचित महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मालाड स्टेशन, सोमवार बाजार, लिबर्टी गार्डन परिसराचा समावेश आहे. या प्रभागामध्ये मनसेचे नगरसेवक दिपक पवार हे त्यांच्या वहिनींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. 47 प्रभागही महिलांसाठी राखीव असून त्यात एव्हरशाईन नगर, माईंडस्पेस, मोटापाडा, राजनपाडा, काचपाडा विभागाचा समावेश आहे. प्रभाग 49साठी महिला आरक्षण असून त्यात मढ, अंबोजवाडी परिसराचा समावेश आहे. नवीन प्रभाग मालवणीत आले आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार असलम शेख यांचे या भागात वर्चस्व असल्यामुळे याचा फायदा कॉंग्रेसला होणार हे निश्चित.

"माझा वॉर्ड जरी महिलांसाठी आरक्षित झाला असला तरी राठोडी, आजमी नगर या वॉर्ड 33 मधून निवडणुक लढविण्यास इच्छूक आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल," असं मढचे विदयमान नगरसेवक अजित भंडारी यांनी सांगितले.

"माझा प्रभाग महिला आरक्षण झाल्यामुळे मी माझ्या जुना प्रभाग 45 हाजीबापू रोड इथून निवडणूक लढवणार आहे," असे भाजप नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा