Advertisement

'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना...'; जामीनावर बाहेर येताच नितेश राणेंचा इशारा

'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल' असा इशारा नितेश राणे यांनी दिला. त्यामुळं आता नितेश राणे कोणत्या नेत्यांबद्दल बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना...'; जामीनावर बाहेर येताच नितेश राणेंचा इशारा
SHARES

जात मुचलक्यावर जामीन मंजूर होताच आमदार नितेश राणे गुरूवारी सिंधुदुर्गला रवाना झाले. जामीन अर्जाची पूर्तता करण्यासाठी ते सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी 'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल' असा इशारा नितेश राणे यांनी दिला. त्यामुळं आता नितेश राणे कोणत्या नेत्यांबद्दल बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

''मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे. ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल'' असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

''कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? राजकारणाचा स्तर खालावला आहे यावरही विचार करावा. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोवा निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी होती मात्र तेथेही मी जावू शकलो नाही. त्यामुळे तब्येत सांभाळून मी कामाला लागणार आहे'', असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा