Advertisement

रामदास आठवले म्हणताहेत, 'नरेंद्र मोदी तर फकीर'


रामदास आठवले म्हणताहेत, 'नरेंद्र मोदी तर फकीर'
SHARES

''नरेंद्र मोदी म्हणजे एक फकीर, कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता त्यांनी नोटाबंदी करून देशाचा फायदा केला. मोदींनी देशासाठी जे काही केलं. ते डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे चलन बदलण्याच्या गरजेतून केलं. त्यानुसार ही नोटाबंदी झाली. मोदींच्या या निर्णयाचं स्वागत करत आम्ही महाराष्ट्रभर 'व्हाइट मनी डे' साजरा केला'', हे शब्द आहेत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे.


नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 'व्हाईट मनी डे'

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी रिपाइंने दादरच्या चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून नोटाबंदीच्या समर्थनार्थ 'व्हाईट मनी डे' साजरा केला. स्वागतसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आठवले यांनी अभिनंदनही केलं.



भीम अॅपद्वारे डाॅ. आंबेडकरांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या संकल्पनेतूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. डॉ. आंबेडकरांच्या अर्थविषयक विचारांचा जाहीर गौरव करणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अॅपची निर्मिती त्यांनी केली. 

देशातील काळापैसा, काळाबाजार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी दर १० वर्षांनी चलन बदलण्याचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे. त्याची अंमलबजावणी पंतप्रधान मोदींनी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असंही यावेळी आठवले म्हणाले.



विरोधकांचा ब्लॅक डे

विरोधक आजचा दिवस 'ब्लॅक डे' साजरा करत आहेत. कारण त्यांचा पैसा काळा आहे. त्यामुळे ते लोक असंच बोलणार, असा टोला त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला. 'भीम अॅप'च्या माध्यमातून वाढत असलेल्या डिजिटल व्यवहाराचं कौतुक देखील आठवले यांनी केलं.



हेही वाचा - 

८ नोव्हेंबर आणि नोटाबंदीसंदर्भातील 'या' ८ गोष्टी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा