Advertisement

खुल्या प्रभागात महिलांना 'नो एंट्री'


खुल्या प्रभागात महिलांना 'नो एंट्री'
SHARES

चेंबूर - एम पश्चिम विभागातील खुल्या झालेल्या प्रभागात भाजपाने महिलांना संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर यांनी हा माहिती दिली.
या विभागात सध्या प्रभाग क्रमांक १४३ मध्ये महादेव शिगवन आणि प्रभाग क्रमांक१४५ मध्ये जयश्री पालांडे हे भाजपाचे दोन नगरसेवक आहेत. यातील १४३ हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. तर १४५ हा खुला झाला आहे. तसेच १४१ हा प्रभागदेखील खुला झाला आहे. "या दोन्ही ठिकाणी चांगला उमेदवार देण्याचा मानस भाजपाचा आहे. या ठिकाणी काही महिला उमेदवार देखील इच्छूक आहेत. मात्र महिलांना खुला प्रभांमध्ये संधी दिलीच जाणार नाही", असे भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement