Advertisement

मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे‘दशक्रिया’वर गप्प का? - विखे पाटील


मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे‘दशक्रिया’वर गप्प का? - विखे पाटील
SHARES

मराठी चित्रपटांना अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मुस्कटदाबी होत असताना गप्प का? अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


'हा सिनेमा थाटामाटात प्रदर्शित व्हायला हवा होता'

दशक्रिया’ चित्रपटाचे औरंगाबाद आणि पुण्यात प्रदर्शन होण्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. साहजिकच हा चित्रपट म्हणजे एक दर्जेदार कलाकृती असणार, हे निश्चित आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या थाटामाटात प्रदर्शित व्हायला हवा होता. पण, त्याऐवजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात पाडण्याचे काम सुरू असून, सरकार आणि सरकारमधील मराठीचे स्वयंघोषित तारणहार त्यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत. या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये व्यत्यय येऊ शकतो, याची कल्पना असतानाही वेळीच पावले उचलून पुरेसा पोलिस बंदोबस्त का तैनात केला गेला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


'मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार'

गोवा येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचा खेळ तांत्रिक सबब सांगून रद्द करण्यात आला. खरे तर ही तांत्रिक अडचण दूर करणे सरकारला सहज शक्य होते. पण, आणखी एका मराठी चित्रपटावर अन्याय होत असताना मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार मात्र निमूटपणे मूग गिळून बसल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.



हेही वाचा

एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये 'दशक्रिया'ची निवड!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा