Advertisement

विद्या चव्हाण यांना नोटीस, अमृता फडणवीसांना ‘डान्सिंग डॉल’ बोलणं भोवलं

अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

विद्या चव्हाण यांना नोटीस, अमृता फडणवीसांना ‘डान्सिंग डॉल’ बोलणं भोवलं
SHARES

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

जितेन गजारिया यानं रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यानं केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

गजारिया हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला.

या प्रकरणी त्या म्हणाल्या, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यात अमृता फडणवीस म्हणतात, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

संजय राऊतांसह परिवारालाही कोरोनाची लागण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा