Advertisement

Maharashtra Budget 2020: अर्थसंकल्प नाही तर जाहीर सभेतील भाषण - देवेंद्र फडणवीस

हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पोकळ भाषण असून अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतील भाषण केलं आहे, अशा शब्दात अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे.

Maharashtra Budget 2020: अर्थसंकल्प नाही तर जाहीर सभेतील भाषण - देवेंद्र फडणवीस
SHARES

 अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी शुक्रवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पोकळ भाषण असून अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतील भाषण केलं आहे, अशा शब्दात अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. 

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा झाली असून अर्थसंकल्प समतोल नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर पडला आहे. तर कोकणाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पाने केले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांचं  हे केवळ अर्थमंत्र्यांचं भाषण होतं. कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण नव्हतं. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे. किती तूट राहील किंवा अधिक्य राहील अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत.  शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, मुदत कर्जाच्या संदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळं शेतकऱ्याचा सातबारा कोरा होऊच शकत नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, ५० हजार आणि एक लाख रुपये मदत देण्याचं वचन दिलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग केला आहे. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्यावेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता हीच घोषणा सरकारने केली आहे. हे सरकार १० लाख तरुणांना रोजगार देणार नाही तर फक्त ११ महिन्यांचा अॅप्रेंट्रीस प्रशिक्षण देणार आहेत हे सरकार दिशाभूल करत आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली. 



हेही वाचा -

Maharashtra Budget 2020 Live: स्वस्त घरे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना दिलासा आणि बरंच काही…




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा