Advertisement

Maharashtra Budget 2020: स्वस्त घरे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना दिलासा आणि बरंच काही…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी शुक्रवारी सादर केला.

Maharashtra Budget 2020: स्वस्त घरे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना दिलासा आणि बरंच काही…
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी शुक्रवारी सादर केला. राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेषकरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या विचारधारेला न्याय देत अर्थसंकल्पात सर्वसमावेशक योजनांचा समावेश करण्यात अर्थमंत्र्यांना यश आल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी घवघवीत योजनांसोबत, भूमिपुत्रांना नोकऱ्यांत आरक्षण, मुद्रांक शुल्कात १ टक्क्यांची कपात आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर १ रुपयांची करवाढ ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

हेही वाचा- राज्यभरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होणार 

राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, सध्या देशात करोनाचे संकट आहे. त्याचा फटका  शेअर मार्केटला बसून सेन्सेक्स १ हजार अंकांनी पडला. मंदीचा देशाला आणि राज्याला फटका बसत आहे. या सर्व परिस्थितीत आम्हाला विकासाच्या योजना मांडायच्या होत्या. समाजातील गरीब, वंचित घटकांना न्याय द्यायचा होता. अर्थसंकल्पाच्या माध्यातून आम्ही हा प्रयत्न केला आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी (farmers loan waiver scheme) अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी २२ हजार कोटींची तरतूद केली. शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करता यावा म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १ लाख या प्रमाणे ५ लाख सौर कृषीपंप राज्य सरकारतर्फे बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटी प्रस्तावित करण्यात आले.  

भूजल पातळी वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना' राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऊसासह इतर पिकांच्या ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येईल. ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्याची तरतूद करत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला.

हेही वाचा- काही मिनिटांत ४ लाख कोटींचा चुराडा, शेअर बाजार कोसळला

बरोजगार तरूणांना रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. १० वी उत्तीर्ण झालेल्या २१ ते २८ वयोगटातील तरूणांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तर, उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्याची तरतूद त्यांनी केली. स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळाव्यात म्हणून कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या २ वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये १ टक्के सवलत देण्यात आली आहे.
  • औद्योगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे.   
  • महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद  
  • गाव तिथे एसटी यासाठी १६०० नव्या एसटी बस विकत घेण्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद, बस स्थानकांसाठी २०० कोटींची तरतूद 
  • आरोग्यासाठी ५ हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटींची तरतूद  
  • क्रीडा संकुलासाठी भरीव तरतूद, राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठीचा निधी ८ कोटींवरुन २५ कोटी रुपये
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा